Ad will apear here
Next
घाटकोपर येथे प्रथमच दिवाळी पहाट कार्यक्रम
संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानतर्फे आयोजन
घाटकोपर : येथील संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानतर्फे या वर्षी प्रथमच घाटकोपर येथे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सात नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी सात वाजता झबेरीबेन पोपटलाल सभागृहात ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा कार्यक्रम होणार आहे.

महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि घाटकोपर परिसरातील नागरिकांना एकत्र जमवून दिवाळी सण उत्साहाने आणि आनंदाने साजरा करण्याच्या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा मनोरंजनात्मक कार्यक्रम मुंबईतील कलारंजना संस्थेतर्फे सादर केला जाणार आहे.  

‘कार्यक्रमाच्या प्रवेशिका एक नोव्हेंबरपासून सकाळी नऊ ते दुपारी १२ आणि सायंकाळी पाच ते रात्री आठ या वेळेत झबेरीबेन पोपटलाल सभागृहात उपलब्ध होतील. घाटकोपर परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे,’ असे आवाहन प्रतिष्ठानचे विश्वस्त मोहन सालेकर यांनी केले आहे.

कार्यक्रमाविषयी :
दिवस :
आठ नोव्हेंबर २०१८
वेळ : सकाळी सात वाजता
स्थळ : झबेरीबेन पोपटलाल सभागृह, उपाश्रय लेन, घाटकोपर पूर्व.  
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZHYBT
Similar Posts
पोरबंदरमधल्या दिवाळीची आठवण काही कामानिमित्त पोरबंदरला गेलेल्या मनोहर जोगळेकर यांना दिवाळीच्या कालावधीतही तिथेच राहावे लागले होते. त्या वेळच्या आठवणी जागवणारा हा त्यांचा लेख...
रत्नागिरीत ‘स्वराभिषेक’तर्फे दिवाळी पहाट रत्नागिरी : शहरातील स्वराभिषेक आणि जयेश मंगल पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने सात नोव्हेंबर २०१८ रोजी दिवाळी पहाटे साडेपाच वाजता जयेश मंगल पार्क येथे सुरेल मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
आयुष्याचा ‘टर्निंग पॉइंट’ ठरलेली दिवाळी... दिवाळीत केलेला व्यवसाय हा आयुष्याचा ‘टर्निंग पॉइंट’ कसा ठरला, याबद्दल लिहीत आहेत बोरीवलीचे नितीन जोगळेकर...
भिवंडीत पारंपरिक आदिवासी दिवाळी महोत्सव भिवंडी : सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व आदिवासी विकास क्षेत्रात काम करणाऱ्या येथील विजेता विचार फाउंडेशन आणि जायंट्स ग्रुपचा सहेली ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने भिवंडीतील काटई येथील डोंगरपाडा दिवानमाल या आदिवासी पाड्यावर पाच नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत पारंपरिक आदिवासी दिवाळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language